प्रकरण २ पैसा स्वाध्याय
प्रकरण
२
पैसा
स्वाध्याय
प्रश्न १ सहसंबंध पूर्ण करा :
१) पैशाचे प्राथमिक कार्य : विनिमयाचे साधन :: दुय्यम कार्य : मूल्य हस्तांतरण
२) अनुषंगिक कार्ये : पतपैशाचे आधार :: पैशाची दुय्यम कार्ये : विलंबित देणी
देण्याचे साधन
३) वस्तूपैसा : शंख – शिंपले :: प्लॅस्टिक पैसा : क्रेडीट कार्ड
४) विभाज्यता : कमी मूल्यांमध्ये विभागणी :: वहनियता : पैशाचे स्थलांतरण
करणे सोपे होते
५) वस्तुविनिमय : वस्तू :: आधुनिक अर्थव्यवस्था : पैसा
प्रश्न २ योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द सांगा :
१)
वस्तूची वस्तूशी केलेली देवाणघेवाणीची
क्रिया वस्तुविनिमय
२)
भविष्यात परतफेड करण्याची तरतूद विलंबित देणी
३)
अशी यंत्रणा ज्यामध्ये चलनाद्वारे
फेड करण्याची सोय पैसा
४)
तारण या साधनाचा वापर करून
खात्यावरील रकमेचे स्थानांतरण करता येते
मूल्य हस्तांतरण
५)
पैशाचे मूल्य संगणकाच्या सहाय्याने
हार्ड ड्राईव्ह किंवा सर्व्हर वर साठवता
येणे व
इलेक्ट्रॉनिकने स्थानांतरीत करता येणे अंकात्मक
पाकीट
६)
असा पैसा जो खाती जमा नाही व सरकारला
ही याबाबत माहिती दिलेली
नाही काळा पैसा
प्रश्न ३ योग्य पर्याय निवडा :
१) पैशाच्या उत्कांतीनुसार क्रम लावा.
अ) धातू पैसा आ) पशू
पैसा
इ) धातूची नाणी ई) वस्तू पैसा
पर्याय : १) अ, आ,
इ, ई २) आ,
ई, अ, इ ३) ई,
इ, अ, आ ४) इ, अ,
आ, ई
उत्तर : २) आ, ई, अ, इ
२) पैशाच्या उत्कांतीनुसार क्रम लावा.
अ) प्लॅस्टिक पैसा आ) कागदी पैसा इ) इलेक्ट्रॉनिक पैसा ई) पत
पैसा
पर्याय : १) आ, ई, अ,
इ २) अ, आ,
इ, ई ३) ई,
इ, अ, आ ४) इ, अ, आ,
ई
उत्तर : २) आ, ई, अ, इ
प्रश्न ३. अ) विसंगत शब्द ओळखा :
.१. पैशाचे प्रकार : धातू
पैसा, कागदी पैसा, काळा पैसा, प्लास्टिक पैसा
उत्तर : काळा पैसा
२. पैशाचे गुणधर्म : विभाज्यता, टिकाऊपणा, सार्वत्रिक स्वीकार्यता, अमूल्य
उत्तर : अमूल्य
प्रश्न ४ खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा :
१) वसंतशेट त्याच्या दुकानांतील कोळसा शेतकऱ्यांना त्याच्या धान्यांच्या बदल्यात देतो.
संकल्पना : वस्तुविनिमय
पद्धत
स्पष्टीकरण : वस्तुविनिमय म्हणजे वस्तूच्या बदल्यात वस्तू देणे – घेणे होय. ज्या
आर्थिक व्यवहारात वस्तूच्या मोबदल्यात वस्तू दिल्या जातात अशा व्यवहारास
वस्तुविनिमय असे म्हणतात.
या उदाहरणात देखील वसंतशेट व शेतकरी यांच्यातील व्यवहारात वस्तूंची
देवाणघेवाण झालेली आहे.
२) बबनराव त्यांचे पैसे राष्ट्रीयकृत बँकेत ठेवतात.
संकल्पना : मूल्यसंचयनाचे
साधन
स्पष्टीकरण : पैसा मूल्यसंचयनाचे कार्य करतो. पैसा वर्तमानकाळातील गरजांची पूर्तता
करण्याबरोबरच भविष्यातील गरजांची पूर्तता करण्यासाठी वापरला जातो. हे बचतीमुळे
शक्य होते.
या उदाहरणात देखील बबनराव भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे
राष्ट्रीयकृत बँकेत ठेवतात.
३) चारूने तिच्या लहान भावासाठी डेबीट कार्ड वापरून शर्ट खरेदी केला.
संकल्पना : प्लॅस्टिक पैसा
स्पष्टीकरण : आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे व्यवहारात वापरले जाणारे डेबीट व क्रेडिट कार्डस
प्लॅस्टिक पैसा म्हणून वापरले जातात.
या उदाहरणात देखील चारूने आपल्या व्यवहारात डेबिट कार्डचा वापर केला आहे यालाच प्लॅस्टिक पैसा असे म्हणतात. ४) मालतीने मध्यस्थामार्फत घर खरेदी केले. मध्यस्थाने तिच्याकडून मध्यस्थीचे पैसे रोख घेतले आणि त्याची पावती दिली नाही.
संकल्पना : काळा पैसा
या उदाहरणात देखील मालतीने मध्यस्थाला जे मध्यस्थीचे पैसे दिले ते रोख
स्वरुपात दिल्याने येथे करचुकवेगिरी केली गेली आहे यालाच काळा पैसा असे म्हणतात.
५) राष्ट्रीय चलनाचा अपव्यय / अयोग्य वापर टाळण्यासाठी काही वेळेस प्रचलित चलन प्रतिबंधित करण्यात येते.
संकल्पना : विमुद्रिकरण
स्पष्टीकरण : नाणे, नोटा किंवा मौल्यवान धातूचा कायदेशीर निविदा म्हणून वापर रद्द
करणे होय. म्हणजेच नाणी किंवा नोटा चलनातून बाद किंवा काढून टाकणे म्हणजेच
विमुद्रिकरण होय.
प्रश्न ५ खालील विधानांशी आपण सहमत ‘आहात’ किंवा ‘नाहीत’ ते सकारण स्पष्ट करा.
१) वस्तुविनिमयात कोणत्याही अडचणी दिसून येत नाही.
उत्तर : या विधानाशी मी
सहमत नाही.
सकारण : वस्तुविनिमयात पुढीलप्रमाणे अडचणी दिसून येतात.
१) गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव : वस्तुविनिमय व्यवस्थेची मुख्य मर्यादा
म्हणजे गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव होय. उदा. ‘अ’ व्यक्तीकडे कापड आहे
त्याबद्द्ल्यात त्याला तांदूळ हवा आहे. ‘ब’ व्यक्तीकडे तांदूळ आहे पण त्याला ‘अ’
व्यक्तीकडून कापड नको आहे यामध्ये दुहेरी संयोगाचा अभाव असल्याने
वस्तुविनिमय शक्य नाही.
२) मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव : वस्तुविनिमय पद्धतीत वस्तूचे मूल्य मापना
करिता ठराविक मापदंड नव्हते. उदा. १ मीटर कापडाची तुलना १ किलो तांदुळाबरोबर
करता येत नाही.
३) विलंबित देणी देण्यातील अडचण : विलंबित देणी म्हणजे भविष्यात परतफेड
करावयाची देणी किंवा कर्ज होय. परंतु वस्तुविनिमयात वस्तूरूपाने परतफेड करणे सोपे
नव्हते. त्यामुळे येथे वस्तूविनिमय पद्धतीची अडचण होती.
४) वस्तूंचा साठा करण्यातील अडचण : भविष्यात उदभवणाऱ्या समस्यांवर मात
करण्यासाठी वस्तूंचा साठा करून ठेवणे अवघड होते. कारण नाशवंत वस्तूंचा साठा करणे शक्य नव्हते.
अशा प्रकारे वस्तुविनिमय पद्धतीत अडचणी होत्या.
२) आधुनिक चलनाची अनेक चांगली गुणधर्म दिसून येतात.
उत्तर : या विधानाशी सहमत आहे.
सकारण : आधुनिक चलनाची अनेक चांगली गुणधर्म पुढीलप्रमाणे आहेत.
१) सार्वजनिक
स्वीकार्यता : पैसा हा सर्वत्र स्वीकार्य असल्याने पैशाला विनिमयाचे साधन म्हणून वापरतात.
२) विभाज्यता : पैशाचे विभाजन छोट्या मूल्यात करता येते.
३) टिकाऊपणा :
टिकाऊपणा या गुणधर्मामुळे पैसा पुन्हापुन्हा व्यवहारात वापरला जातो.
४) वहनीयता :
पैसा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येतो.
५) एकजिनसीपणा : पैशाचे हे एक महत्त्वाचा गुणधर्म आहे की एखाद्या विशिष्ट
परिमाणाचे पैसे गुण वैशिष्ट्यामुळे एकजिनसी दिसतात.
अशा प्रकारे आधुनिक चलनाची अनेक चांगली गुणधर्म आहेत.
३) पैशाद्वारे अनेक
कार्ये पूर्ण केली जातात.
उत्तर : या विधानाशी सहमत
आहे.
सकारण : पैशाद्वारे पुढील कार्ये पूर्ण केली जातात.
I. प्राथमिक कार्ये : i) विनिमयाचे माध्यम : पैशाच्या
साहाय्याने वस्तू व सेवांची खरेदी विक्री केली जाते. ii) मूल्यमापनाचे साधन : वस्तू व सेवांची किंमत पैशात व्यक्त करतात. पैशामुळे
वस्तूंच्या किंमतीची तुलना करता येते.
II. दुय्यम कार्ये : i) विलंबित देणी देण्याचे साधन : पैशामुळे
कर्ज देणे व परतफेड करणे सोपे जाते. ii) मूल्यसंचयनाचे साधन : पैशाद्वारे बचत करता
येते. बचत केलेले पैसे भविष्यातील गरजांची पूर्तता करण्यासाठी वापरता येतात. Iii) मूल्य
हस्तांतरणाचे साधन : पैशामुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आणि एका
ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूल्याचे हस्तांतरण करता येते.
III. अनुषंगिक कार्ये : i) राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन :
राष्ट्रीय उत्पन्न पैशात व्यक्त केले जाते. ii)
पतपैशाचा आधार :
पैसा हा पत निर्मितीसाठी रोखतेचा आधार आहे. Iii)
संपत्तीचे रोखतेत रुपांतरण : कोणतीही
मालमत्ता पैशात रूपांतरित करता येते.
अशा प्रकारे पैशाद्वारे अनेक कार्य पूर्ण करतात.
४) पैसा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे कुठेही सहज स्थानांतरित करता येतो.
उत्तर : या विधानाशी सहमत आहे.
सकारण : १) इ-पैसा किंवा इलेक्ट्रॉनिक पैशाला मौद्रिक मूल्य असून ते इलेक्ट्रॉनिक यंत्रणेच्या साहाय्याने हस्तांतरित केले जाते. उदा. मोबाईल फोन, संगणक इ. इलेक्ट्रॉनिक पैसा जागतिक व्यवहारामध्ये वापरला जातो.
२) पैसा सहज पणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गुगल पे, फोन पे, मोबाईल बँकिंग इ. मार्फत पाठविता येतो. यालाच इलेक्ट्रॉनिक माध्यम असे म्हणतात.
प्रश्न ६ खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा.
गणेश
बसने मॉलला गेला. त्याने तिकीट काढण्यासाठी वाहकाला दहा रुपयांचे नाणे दिले. मॉल
मधून त्याने अनेक वस्तू घेतल्या.
घेतलेल्या
वस्तूंचे पैसे देण्यासाठी त्याने क्रेडिट कार्ड वापरले. परंतु पैसे घेणाऱ्या
माणसाने त्याला आम्ही फक्त डेबिट कार्ड गेतो असे सांगितले. गणेशचे डेबिट कार्ड घरी
राहिल्याने त्याने रोख पैशाने देयक भरले.
१) वरील व्यवहारात कोणकोणत्या प्रकारचे पैसे वापरले ते सांगा.
उत्तर : वरील व्यवहारात सुरवातीस बस वाहकास धातूंची नाणी दिली, प्लॅस्टिक पैसा आणि कागदी पैसा या प्रकारचे पैसे वापरले.
२)
त्यांपैकी कोणत्याही दोन प्रकारांचे
पैसे स्पष्ट करा.
उत्तर : दोन प्रकारच्या पैशांचे
स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे :
१)
धातूंची नाणी : धातूंची नाणी निकेल, अॅल्युमिनिअम
यांसारख्या कमी दर्जाच्या धातू पासून बनविलेली असतात. तुलनेने कमी रकमेच्या
व्यवहारासाठी ती वापरली जातात.
२)
प्लॅस्टिक पैसा : डेबिट किंवा
क्रेडिट कार्ड वापरून व्यवहार करणे म्हणजे प्लॅस्टिक पैसा होय.
Comments
Post a Comment