11 th Economics Objective Type Question Bank
११ वी प्रश्नपेढी वार्षिक परीक्षा वस्तुनिष्ठ प्रश्न
प्रश्न.१ अ) योग्य
पर्याय निवडा : (५)[२०]
१) संपत्तीच्या बाबतीत खालील
विधाने लागू होतात-
अ) संपत्ती
म्हणजे अशी कोणतीही वस्तू जिला बाजार मूल्य आणि त्याची देवाण घेवाण करता
येते.
ब) संपत्तीत
मनुष्य बाहयता आहे
क) संपत्तीत
उपयोगिता नसते
ड) संपत्तीत
दुर्मिळ्ता आणि विनिमयता आहे
पर्याय - १) अ,ब,ड २) अ,क,ड ३) ब,क,ड ४) यापैकी काही नाही
उत्तर : पर्याय १)
अ,ब,ड
२) पैशाच्या
उत्क्रांतीनुसार क्रम लावा-
अ) प्लास्टिक
पैसा ब) कागदी पैसा क)
इलेक्ट्रॉनिक पैसा ड) पत पैसा
पर्याय - १) ब,ड,अ,क
२) ब,क,ड,अ ३)
ड,क,ब,अ ४)
क,ब,अ,ड
उत्तर : पर्याय १)
ब,ड,अ,क
३) खालील
सारणीचे चौथे दशमक (D४) कोणते ?
सारणी - १०,
१५,
७,
८, १२, १३, १४, ११,
९
पर्याय - १)
७ २) ९
३) १० ४) १२
उत्तर : पर्याय ३) १०
४) खालील पैकी
भारतातील लोकसंख्या विस्फोटाचे कारण नाही-
अ) निरक्षरता
ब) विवाहाची सार्वत्रीकता
क) एकत्र कुटुंब पद्धती ड) राहणीमानातील सुधारणा
पर्याय- १)
अ,२)
ब ३) क
४) ड
उत्तर : पर्याय ४) ड
५) स्वातंत्र्यानंतर भारताने --------- स्वीकार
केला
अ) समाजवादाचा ब) भांडवलशाहीचा क) समिश्र अर्थव्यवस्थेचा ड) साम्यवादाचा
पर्याय - १) अ
२)
ब ३) क ४)
ड
उत्तर : पर्याय ३) क
६) लोकसंख्या विस्फोटावर केल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक
उपायामध्ये यांचा समावेश होतो.
अ) रोजगाराच्या
संधी निर्माण करणे ब)
महिलांचा दर्जा सुधारणे
क) राष्ट्रीय
लोकसंख्या कार्यक्रम ड) आपत्ती
व्यवस्थापन
पर्याय :- १) फक्त ड २) अ आणि क ३) क आणि ड ४) अ,ब आणि क
उत्तर : पर्याय ४) अ,ब आणि क
७) राष्ट्रीय
उत्पन्नात खालील घटकांचा विचार केला जातो .
अ)
राष्ट्रीय उत्पन्नात
अंतिम वस्तू व सेवांचा समावेश होतो
.
ब)
यात आर्थिक वर्षातील
उत्पादित वस्तू व सेवांचा समावेश होतो
.
क)
दुहेरी मोजदाद टाळली
जाते .
ड)
बाजारभावानुसार मूल्य
विचारात घेतले जाते .
पर्याय :- १) अ
आणि क २) ब
आणि क ३) अ,ब आणि ड ४)
अ,ब,क आणि ड
उत्तर : पर्याय ४) अ,ब,क आणि ड
८)
खालील विधाने चतुर्थकासाठी लागू होत नाही .
अ) प्रथम संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून
घ्यावी .
ब) यात निरीक्षणाचे समान चार भाग करता येतात .
क) ते Q१
, Q२ , Q३ असे
सांकेतिक दाखवितात .
ड) Q२
हा सारणीचा मध्यगा
असते .
पर्याय
:- १)
फक्त अ २) ब
आणि क ३) अ,ब
आणि क ४)
यापैकी नाही
उत्तर : पर्याय ४) यापैकी नाही
९) पैशाच्या
उत्क्रांतीनुसार क्रम लावा .
अ
) प्लॅस्टिक पैसा ब) कागदी
पैसा क) इलेक्ट्रॉनिक पैसा ड) पत
पैसा
पर्याय
:- १)
ब,ड,अ आणि क २)
अ,ब,क आणि ड ३) क,ड,अ
आणि ब ४) अ,ड,ब
आणि क
उत्तर : पर्याय १) ब,ड,अ आणि क
१०) सद्यस्थितीत
सार्वजनिक क्षेत्रासाठी आरक्षित उद्योगांची संख्या इतकी आहे .
अ)
३ ब) २
क) ५
ड) ७
पर्याय
:- १) फक्त
अ २) फक्त
क ३) फक्त
ड ४)
फक्त ब
उत्तर
: पर्याय ४) फक्त ब
११) ॲडम स्मिथ
यांच्या बाबतीत कोणते विधान किंवा विधाने लागू होत नाही.
अ) ॲडम स्मिथ यांना
सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणतात.
ब)
ॲडम स्मिथ यांनी राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहिला.
क)
अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे.
ड)
अर्थशास्त्रीय सामान्य माणसाचा अभ्यास करते.
पर्याय : १) ड २) अ,ब आणि क ३) अ आणि ड ४) क आणि ड
उत्तर : पर्याय
क्र. १) ड
१२)
पैशाच्या उत्क्रांतीनुसार क्रम लावा.
अ) धातूपैसा
ब) पशुपैसा
क) धातुची नाणी ड) वस्तू
पैसा
पर्याय
: १) अ,ब,क,ड २) ब,ड,अ,क ३)
ड,क,अ,ब ४) क,अ,ब,ड
उत्तर
: पर्याय क्र. २) ब, ड, अ, क
१३) खालील
संख्या श्रेणीचे पाचवे दशमक (D५) कोणते?
संख्याश्रेणी : १३, १२, ११, १५, १४, १६,
१७, १८, १९,
पर्याय : १) १५ २) १४ ३) १६ ४)
१७
उत्तर
: पर्याय क्र. १) १५
१४) आर्थिक
नियोजनाच्या बाबतीत खालील बाबी बरोबर आहेत.
अ) नियोजन
आयोगाची स्थापना सन १९५० मध्ये करण्यात आली.
ब) पंतप्रधान
हे नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
क) आर्थिक नियोजन हा
कालबद्ध कार्यक्रम आहे.
ड) नियोजन ही सतत चालणारी
प्रक्रिया आहे.
पर्याय- १) अ,
ब
२) क,ड ३)
अ,ब,क ४) अ,ब,क, ड
उत्तर : पर्याय क्र. ४) अ,ब,क, ड
१५) पैशाची अनुषंगिक कार्ये
अ)
स्थूल आर्थिक
चलांचे मापन ब) मूल्यसंचयनाचे साधन
क)
पतपैशाचा आधार ड) राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन
पर्याय : १) अ ब आणि क २) ब, क आणि ड ३) अ, ब आणि ड
४) अ, क आणि ड
उत्तर : पर्याय क्र. ४) अ, क आणि ड
ब) सहसंबध पूर्ण करा. [५]
१)
नैसर्गिक शास्त्र : तंतोतंत शास्त्र :: सामाजिकशास्त्र : अमूर्त शास्त्र
२) वस्तू पैसा
: शंख शिंपले :: प्लॅस्टिक पैसा : क्रेडीट कार्ड
३) हंगामी
बेरोजगारी : पर्यटन मार्गदर्शक :: सुशिक्षित
बेरोजगारी : पदवी धारक
४) आर्थिक
पायाभूत सुविधा : ऊर्जा :: सामाजिक
पायाभूत सुविधा : आरोग्य
५) खाजगीकरण
: खाजगी क्षेत्राचा सहभाग :: उदारीकरण
: आर्थिक
स्वातंत्र्य
६) हंगामी
बेरोजगारी : पर्यटन मार्गदर्शक :: सुशिक्षित
बेरोजगारी : पदवीधारक
७) पहिली पंचवार्षिक योजना : कृषी क्षेत्राचा
विकास :: दुसरी पंचवार्षिक योजना : अवजड उद्योगांचा विकास
८) ग्रामीण क्षेत्र : २४०० उष्मांक :: शहरी क्षेत्र
: २१०० उष्मांक
९) नीती आयोगाची स्थापना : २०१५ :: नियोजन मंडळाची स्थापना : १९५०
१०) पैशाचे अनुषंगिक कार्य : पतपैशाचा आधार :; पैशाचे दुय्यम कार्य : विलंबित देणे देण्याचे
साधन
११) कृषी निर्यात क्षेत्र : A
E Z :: विशेष आर्थिक
क्षेत्र : SEZ
१२) ग्रामीण बेरोजगारी : हंगामी बेरोजगारी
:: नागरी बेरोजगारी : औद्योगिक
बेरोजगारी
१३) १९५१ - १९५६ : पहिली पंचवार्षिक योजना ::
२०१२-२०१७ : बारावी पंचवार्षिक योजना
क) विसंगत
शब्द ओळखा. [५]
१) शेतकर्यांचा
कर्जबाजारीपणा, कोरडवाहु जमीन,
भांडवलाची कमतरता, अभियांत्रिकी
२) शहरी
भागातील बेकारी - सुशिक्षित बेरोजगारी, औद्योगिक
बेरोजगारी, छुपी बेरोजगारी,
तांत्रिक बेरोजगारी
३) रेशनकार्डचे
रंग - पांढरे, हिरवे,
केशरी, पिवळे
४) नवरत्नाचा दर्जा असलेले
धोरण - SPCL, IOC, ONGC, HPCL
५) उष्मांक - २४००, १८००,
२१००,
२२५०
६)
पैशाचे प्रकार –
कागदी पैसा, पत पैसा,
प्लॅस्टिक पैसा, वस्तूविनिमय
पध्दत
७)
कृषी पतपुरवठ्याचे प्रकार – अल्पकालीन, मध्यमकालीन, दीर्घकालीन, दारिद्रय निर्मुलन
८)
महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग - पूणे, नाशिक, हैद्राबाद, नागपूर
९)
वाढत्या जन्मदराची कारणे – निरक्षरता, विवाहाचे वय, संयुक्त कुटुंब पद्धती, मातामृत्युदर
१०)
नवीन आर्थिकधोरण –
उदारीकरण, खाजगीकरण,
विमुद्रीकरण, जागतिकीकरण
११) पैशाचे
गुणधर्म – सार्वत्रिक स्वीकार्यता, पत पैशाचा आधार, टिकाऊपणा, मूल्य स्थिरता
१२) बँकिंग, विमा ,
पर्यटन, मत्स्य व्यवसाय
१३) लोकसंख्या वाढीसाठी
संबंधित संकल्पना – जन्मदर, मृत्युदर , बेरोजगार दर, जिवित प्रमाण दर
१४) निति आयोगाचे सदस्य –
अध्यक्ष, राज्यपाल, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी
१५) कृषी क्षेत्र – मत्स्यव्यवसाय, पर्यटन सेवा, दुग्धव्यवसाय, बागायती शेती.
१६) पर्यटन, बँकिंग, वाहन उत्पादन, विमा.
१७) न्यूनतम लोकसंख्या, अधिकतम लोकसंख्या, पर्याप्त लोकसंख्या, सरासरी लोकसंख्या
ड) योग्य आर्थिक पारिभाषिक
शब्द लिहा.
[५]
१) वस्तूची
वस्तूशी केलेली देवाण-घेवाणीची प्रक्रिया - वस्तुविनिमय पद्धती
२) परकीय
/ विदेशी कंपन्यांनी आपल्या देशात केलेली गुंतवणूक. - उदारीकरण
३) जे
मूल्य संपूर्ण निरीक्षणाचे चार समान भागामध्ये विभागणी करते. - चतुर्थक
४) सार्वजनिक
सत्तेने आर्थिक प्राधान्य क्रमाची जाणीवपूर्वक आणि सहेतुक केलेली निवड. -
- आर्थिक
नियोजन
५) जन्मदर
व मृत्यूदर यांच्यातील फरक. - जीवित
प्रमाणदर
६) तंत्रज्ञानातील बदलामुळे
निर्माण होणारी बेकारी - तांत्रिक बेरोजगारी
७) परकीय कंपन्यांनी आपल्या देशात केलेली गुंतवणूक -
प्रत्यक्ष
विदेशी गुंतवणूक
८) डेबिट कार्ड,
क्रेडिट कार्ड या स्वरूपातील पैसा - प्लॅस्टिक
पैसा
९) स्वयंसहायतेचे मूल्य प्रोत्साहित करणे, लोकशाही, समता आणि एकता जपणे -
सहकार चळवळ
१०) शेती कामासाठी ट्रॅक्टर खरेदीसाठी घेतलेले कर्ज - उत्पादक
कर्ज / दीर्घकालीन कर्ज
११) कारखान्यातील कच्च्या
मालाची टंचाई, कामगार संप यामुळे निर्माण होणारी
बेरोजगारी
- संघर्षजन्य बेरोजगारी
१२) ग्रामीण भागात सीमांत आणि छोट्या शेतकऱ्यांचे दारिद्र्य - ग्रामीण दारिद्र्य
१३) आर्थिक विकासासाठी वस्तूंचे व सेवांचे उत्पादन व विभाजन सुलभ करणे.
- आर्थिक पायाभूत सुविधा
१४) उद्योगातील संघर्षामुळे निर्माण होणारी बेरोजगारी – संघर्षजन्य बेरोजगारी
१५) समाजातील काही विशिष्ट लोकांना संधी नाकारणे – दारिद्र्य
१६) दोन वर्षाच्या कालावधीसाठी दिले जाणारे कर्ज. - अल्पकालीन पतपुरवठा
Comments
Post a Comment