11 वी अर्थशास्त्र सहामाही परीक्षा प्रश्नपेढी

 

11 वी अर्थशास्त्र सहामाही परीक्षा प्रश्नपेढी

प्रश्न १. आर्थिक पारिभाषिक शब्द  सुचवा                                                                                                

        १)     वस्तू व सेवांमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता. - उपयोगिता

        २)     दीर्घकाळात देशाच्या वास्तव उत्पन्नात झालेली संख्यात्मक वाढ – आर्थिक वृद्धी

        ३)     भविष्यात परतफेड करण्याची तरतूद – विलंबित देणी

        ४)     वस्तूची वस्तूशी केलेली देवाणघेवाणीची क्रिया. – वस्तू विनिमय

        ५)     असा पैसा खाती जमा नाही व सरकारला ही याबाबत माहिती दिली नाही - काळा बाजार

        ६)     दुसरे चतुर्थक म्हणजे – मध्यगा  

        ७)     परकीय / विदेशी कंपन्यांनी आपल्या देशात केलेली गुंतवणूक – प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक

 

प्रश्न २ सहसंबंध पूर्ण करा.                                                                                                            

    १) भांडवल : व्याज : : संयोजक : नफा

    २) अर्थशास्त्र : कौटिल्य : : राष्ट्राची संपत्ती : अॅडम स्मिथ

    ३) नैसर्गिक शास्‍त्र : तंतोतंत शास्‍त्र : सामाजिक शास्‍त्र : अमूर्त शास्त्र

    ४) आवश्यक गरजा :  अन्न  :: सुखसोयीच्या गरजा : धुलाई यंत्र

    ५) विनामुल्‍य वस्‍तु :  उपयोगीता मुल्‍य : आर्थिक वस्‍तु : विनिमय मूल्य

    ६) पैशाचे प्राथमिक कार्ये : विनिमयाचे साधन ::  दुय्यम कार्ये  : मूल्य हस्तांतरण

    ७) वस्तू पैसा : शंख – शिंपले : : प्लास्टिक पैसा  : क्रेडीट कार्ड

    ८) वस्‍तुविनिमय : वस्‍तू : आधुनिक अर्थव्‍यवस्‍था : पैसा

    ९) दशमक : ९ : : शतमक : ९९  

    १०) शेती क्षेत्र : प्राथमिक क्षेत्र : : शिक्षण : सेवा क्षेत्र

    ११) आर्थिक पायाभूत सुविधा : उर्जा :: सामाजिक पायाभूत सुविधा : शिक्षण / आरोग्य

प्रश्न ३ विसंगत शब्द ओळख.                                     

१)     अमर्याद गरजा, मर्यादित साधने, गरजांना क्रम नसतो, साधनाचे पर्यायी उपयोग.

- गरजांना क्रम नसतो

 २) संपत्तीचे वैशिष्ट्ये  – उपयोगिता, दुर्मिळता, संयोजक, विनिमयता - संयोजक

 ३) जगातील प्रमुख अर्थशास्त्रज्ञ  – आल्फ्रेड मार्शल, कौटिल्य, जे.एम.केन्स, हेन्री लेनिन

      - हेन्री लेनिन

 ४) गरजा, उपयोगिता, संपत्ती, गुंतवणूक - गुंतवणूक  

 ५) वहनियता, विधीग्राय पैसा, विभाज्यता, टिकाऊपणा - विधीग्राय पैसा

 ६) पैशाचे प्रकार - पशु पैसा, धातू पैसा, वस्तू पैसा, टिकाऊपणा – टिकाऊपणा

 ७) मोबाईल फोन, टॅब्लेट, डेबिट कार्ड, संगणक - डेबिट कार्ड

 ८) प्राण्यांची कातडी, धातूची नाणी, शिंपले , हस्तिदंत - धातूची नाणी

 ८) दशमके, शतमके, पंचमके, चतुर्थके. - पंचमके

 ९) विभाजन मूल्य  - चतुर्थक, दशमक, शतमक, बहुलक - बहुलक

१०) रसायने निर्मिती उदयोग, कापड निर्मिती उदयोग, मनोरंजन उदयोग,

    साखर निर्मिती उदयोग - मनोरंजन उदयोग

११)  कोरडवाहू जमीन, भांडवलाची कमतरता, अभियांत्रिकी, शेतक-यांचे कर्ज - अभियांत्रिकी

१२)  महाराष्ट्रातील  प्रमुख शहरे – पुणे, नागपूर ,नाशिक, हैद्राबाद  - हैद्राबाद                                                

१३)  वाहन, बँकिंग, विमा, पर्यटन – वाहन

प्रश्न ४ योग्य पर्याय निवडा.                                              

१) लिओनेल रॉबिन्स यांच्या व्याख्येत पुढील मुद्द्यांचा विचार केला आहे.                                                   

अ) अमर्याद गरजा                 ब) मर्यादित साधने                                                                                                                                                                

क) गरजांना अग्रक्रम नसतो  ड) साधनांचे पर्यायी उपयोग

पर्याय -अ आणि ब              २) ब आणि क    

            ) अ,ब,क आणि ड      ) अ,ब आणि ड  

उत्तर - ४) अ,ब आणि ड

२)     अॅडम स्मिथ यांच्या बाबतीत कोणते विधान किंवा विधाने लागू होत नाहीत.

अ)   डम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणतात.

ब)    डम स्मिथ यांनी ‘राष्ट्राची संपत्ती’ हा ग्रंथ लिहिला.

क) ‘अर्थशास्त्र’ हे संपत्तीचे शास्त्र आहे.

ड)  अर्थशास्त्र हे सामान्य माणसाचा अभ्यास करते.

पर्याय – १) ड             २) अ,ब आणि क      

 ३) अ आणि ड     ४) क आणि ड.

उत्तर :- १) ड


३)     राष्ट्रीय उत्पन्नात पुढील घटकांचा विचार केला जातो.

अ)   राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तूंचा आणि सेवांचा समावेश होतो.

ब) राष्ट्रीय उत्पन्नात आर्थिक वर्षातील उत्पादित वस्तूंचा आणि सेवांचा समावेश होतो.

क) राष्ट्रीय उत्पन्नात दुहेरी मोजदाद टाळली जाते.

ड) राष्ट्रीय उत्पन्नात बाजारभावानुसार मूल्य विचारात घेतले जाते.

पर्याय – १) अ आणि क     २) ब आणि क     

 ३) अ,ब आणि ड    ४) अ,ब,क आणि ड.

 उत्तर :- ४) अ,ब,क आणि ड.

     ४) संपत्तीच्या बाबतीत खालील विधाने लागू होतात.

    अ) संपत्ती म्हणजे अशी कोणतीही वस्तू जिला बाजार मूल्य

       आणि त्याची देवाण घेवाण करता येते.

    ब) संपत्तीत मनुष्य बाह्यता आहे

    क) संपत्तीत उपयोगिता नसते

    ड) संपत्तीत दुर्मिळ्ता आणि विनिमयता आहे

पर्याय - १) अ,,  २) अ,,  ३) ब,,  ४) यापैकी काही नाही

उत्तर :- १) अ,,   

  ) पैशाच्या उत्क्रांतीनुसार क्रम लावा.

अ) प्लॅस्टिक पैसा        ब) कागदी पैसा

क) इलेक्ट्रॉनिक पैसा  ड) पत पैसा  

पर्याय- ) ब,ड,अ,क    ) क,अ ,ड,ब      

३) ब,क,अ,ड    ४)  अ,ब,ड

उत्तर :- १) ब,ड,अ,क    


६)     पैशाच्या बाबतीत खालील विधाने लागू होतात.


अ)   पैसा म्हणजे अशी वस्तू की विनिमय माध्यम सर्वसाधारणपणे स्वीकार्य असते.

 ब) पैसा मूल्यमापनाचे कार्य करतो.

             क) पैशात उपयोगिता नसते.

 ड) पैसा मूल्यसंचयनाचे कार्य करतो.

पर्याय – १) अ,ब,ड   २) अ,क आणि ड     ३)अ,ब,क आणि ड   ४) यापैकी नाही.

उत्तर :- १) अ,ब,ड

    ७) खालील विधाने चतुर्थकासाठी लागू होत नाही.

अ) प्रथम संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून घ्यावी.  

ब) यात निरीक्षणाचे समान ४ भाग करता येतात.

क) ते Q , Q , Q असे सांकेतिक दाखवितात.

) Q हा सारणीचा मध्यगा असतो.

पर्याय - १) अ  ) ब आणि क     ३) अ, ब, आणि क   ४) यापैकी नाही

उत्तर :- ४) यापैकी नाही

        ८)     खालील सारणीचे सातवे दशमक (D७) कोणते ?

सारणी- ४,  ,  ,  ,  ,  ,  १०,  ११,  १२

पर्याय - १) ७       २) ९        ३) १०       ४) १२

उत्तर :-  ३) १०

        ९)     परकीय / विदेशी कंपन्यांनी आपल्या देशात केलेली गुंतवणूक म्हणजे –


अ)    अंतर्गत् गुंतवणुक    ब) विदेशी गुंतवणुक


क) स्थानिक गुंतवणुक   ड) वैयक्तिक गुंतवणुक

पर्याय १) फक्त अ       २) फक्त ब        

 ३) फक्त क        ४) वरील सर्व

उत्तर :- २) फक्त ब

  १०) महाराष्ट्र राज्याची निर्मिती यावर्षी करण्यात आली .

अ) २ मे १९७०  ब) ५ मे १९८०

क) ७ मे १९९०  ड) १ मे १९६०

पर्याय - १) अ   २) ब   ३) क   ४) ड  

उत्तर :- ४) ड          

        ११)  महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत खालील विधाने लागू होतात.

                अ)   महाराष्ट्र हे देशात दुस-या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे.

                ब) महाराष्ट्र हे देशात भौगोलिक दृष्ट्या तिस-या क्रमांकाचे मोठे असलेले राज्य आहे.

                क) महाराष्ट्र हे नागरीकरण झालेले राज्य आहे.

                ड) महाराष्ट्र हे नवनिर्मिती, कौशल्यविकास, गुंतवणूक आणि पर्यटन यासाठी लोकप्रिय असलेले राज्य आहे.

पर्याय- १) अ,क,   २) अ,ब,क आणि ड ३) अ,,   ४) यापैकी नाही.

उत्तर :- २) अ,ब,क आणि ड

 

प्रश्न ५ खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती संकल्पना स्पष्ट करा.


१)    रमेशच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा अभ्यास.

उत्तर : संकल्पना : वैयक्तिक उत्पन्न

संकल्पनेचे स्पष्टीकरण : वैयक्तिक उत्पन्न म्हणजे एखाद्या व्यक्तीचे किंवा कुटुंबाचे उत्पन्न होय. 

या उदाहरणात रमेशच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे त्याचे वैयक्तिक उत्पन्न होय.

२)    वडीलांनी मला दुचाकी विकत घेवून दिली, त्‍यामुळे माझ्या रोजच्‍या प्रवासाची

     गरज भागते.  

उत्तर : संकल्पना : वैयक्तिक गरज

संकल्पनेचे स्पष्टीकरण  : वेगवेगळ्या गरजा व त्यांचे समाधान वैयक्तिक पातळीवर पूर्ण केले जाते 

त्यास वैयक्तिक गरज असे म्हणतात. वरील उदाहरणात देखील वडिलांनी मला गाडी घेवून दिली 

त्यामुळे माझी वैयक्तिक प्रवासाची गरज पूर्ण होते.

 

३)    नितीनची आई तिच्या पगारातून दरमहा रु.१००० वाचवते.

उत्तर : संकल्पना : वैयक्तिक बचत

  संकल्पनेचे स्पष्टीकरण : भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या उपभोगाचा त्याग 

करून शिल्लक ठेवण्यात येणारा सध्याच्या वैयक्तिक उत्पन्नाचा भाग, म्हणजे ‘वैयक्तिक 

बचत’ होय.

४)    राजीव ने त्याच्या लहान बहिणीसाठी डेबिट कार्ड वापरून ड्रेस खरेदी केला.

संकल्पना : प्लॅस्टिक पैसा

स्पष्टीकरण : आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे व्यवहारात वापरले जाणारे डेबीट व क्रेडिट कार्डस प्लॅस्टिक 

पैसा म्हणून वापरले जातात. या उदाहरणात देखील चारूने आपल्या व्यवहारात डेबिट कार्डचा 

वापर केला आहे यालाच प्लॅस्टिक पैसा असे म्हणतात. 

५)     वसंतशेट त्यांच्या दुकानातील कोळसा शेतकऱ्यांना त्यांच्या धान्याच्या मोबदल्यात देतो.

संकल्पना : वस्तुविनिमय पद्धत

स्पष्टीकरण : स्तुविनिमय म्हणजे वस्तूच्या बदल्यात वस्तू देणे – घेणे होय. ज्या आर्थिक 

व्यवहारात वस्तूच्या मोबदल्यात वस्तू दिल्या जातात अशा व्यवहारास वस्तुविनिमय असे म्हणतात. 

या उदाहरणात देखील वसंतशेट व शेतकरी यांच्यातील व्यवहारात वस्तूंची देवाणघेवाण झालेली आहे. 

६)    बबनराव त्यांचे पैसे राष्ट्रीयकृत बँकेत ठेवतात.

संकल्पना : मूल्यसंचयनाचे साधन

स्पष्टीकरण : पैसा मूल्यसंचयनाचे कार्य करतो. पैसा वर्तमानकाळातील गरजांची 

पूर्तता करण्याबरोबरच भविष्यातील गरजांची पूर्तता करण्यासाठी वापरला जातो. हे 

बचतीमुळे शक्य होते.या उदाहरणात देखील बबनराव भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे 

राष्ट्रीयकृत बँकेत ठेवतात.

७)    जे मूल्य संपूर्ण निरीक्षणाचे चार समान भागामध्ये विभागणी करते.

संकल्पना : चतुर्थक

स्पष्टीकरण : दिलेली सामग्री चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून सामग्रीचे समान चार भागात 

विभाजन केले जाते त्यास चतुर्थक असे म्हणतात.

८)    असे विभाजन मूल्य जे सामग्रीचे शंभर समान भाग करते.

संकल्पना : शतमक  

स्पष्टीकरण :  दिलेली सामग्री चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून सामग्रीचे समान शंभर भागात 

विभाजन केले जाते त्यास शतमक असे म्हणतात.

९)    असे विभाजन मुल्‍य जे सामग्रीचे दहा समान भाग करते.

संकल्पना : दशमक  

स्पष्टीकरण : दिलेली सामग्री चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून सामग्रीचे समान दहा भागात विभाजन केले जाते त्यास दशमक असे म्हणतात.

१०) सिध्दी व तिचे कुटुंब दिवाळीच्या सुट्टीत आठ दिवस समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले.

उत्तर : संकल्पना : पर्यटन

 स्पष्टीकरण : एका व्यक्तीने किंवा व्यक्ती समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी 

मनोरंजनासाठीअभ्यासासाठीकामासाठी केलेला प्रवास म्हणजे पर्यटन होय. मनोरंजनफुरसत 

किंवा कामासाठी केलेला प्रवास म्हणजेच पर्यटन. या उदाहरणात देखील प्राजक्ता व तिचे कुटुंब 

समुद्रकिनारी आनंद घेण्यासाठी गेले होते यालाच पर्यटन असे म्हणतात.

११)   यंत्रमानव तंत्रातील संशोधनासाठी जपानने भारतात एक हजार कोटी गुंतवणूक केली आहे.

उत्तर : संकल्पना - प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक

स्पष्टीकरण :- विदेशी व्यक्तीने किंवा उद्योग संस्थेने दुसऱ्या देशात गुंतवणूक करताना कार्य 

स्थापित करणे म्हणजे प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक होय. या उदाहरणात देखील जपान या विदेशी 

देशाने भारतात गुंतवणूक केली आहे यालाच प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक असे म्हणतात.

१२)    लातूरचा प्रवीण मुंबई येथे चित्रपट सृष्टीत तंत्रज्ञ म्हणून काम करतो.

उत्तर : संकल्पना : मनोरंजन उद्योग

स्पष्टीकरण : मनोरंजन उद्योगात विविध नाटकेदूरदर्शन मालिका, चित्रपट इत्यादि उद्योगांचा 

समावेश होतो. हा उद्योग सेवा क्षेत्रातील महत्वाचा उद्योग आहे. येथे विविध घटकांना रोजगाराच्या 

संधी उपलब्ध होतात.

 

Comments

Popular posts from this blog

स्वाध्याय प्रकरण १ अर्थशास्त्रातील मुलभूत संकल्पना

प्रकरण २ पैसा स्वाध्याय

11 th Economics Objective Type Question Bank