इयत्ता ११ वी कला/वाणिज्य प्रश्न पेढी विषय – अर्थशास्त्र
इयत्ता ११ वी
कला/वाणिज्य प्रश्न पेढी
विषय – अर्थशास्त्र
प्रश्न १. अ) खालील विधाने पूर्ण करा :
१)
डॉ. आल्फ्रेड मार्शल यांच्या ग्रंथाचे नाव ____________.
अ) अर्थशास्त्राची मुलतत्वे ब) राष्ट्राची
संपत्ती क) अर्थशास्त्राचे स्वरूप ड) दुर्मिळता
उत्तर : अर्थशास्त्राची
मुलतत्वे
२)
सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ ___________.
अ) रॉबिन्स ब)
जे.एम.केन्स क) रिकार्डो ड) पिगू
उत्तर : रिकार्डो
३)
सातत्याने सामान्य किंमत पातळीत होणारी वाढ म्हणजे ______ .
अ) मंदी ब) तेजी क) विकास
ड) बचत
उत्तर : तेजी
४)
वस्तूची वस्तूशी केलेली देवाणघेवाणाची क्रिया __________.
अ) पशू पैसा ब) वस्तू पैसा क) धातू पैसा ड)
कागदी पैसा
उत्तर : वस्तू पैसा
५)
भविष्यात परतफेड करण्याची तरतूद
_________.
अ) विलंबीत देणी ब)
वस्तू विनिमय क) विनिमयाचे माध्यम ड) पतपैसा
उत्तर : विलंबीत देणी
६)
दिलेल्या सामग्रीचे चार समान भागांमध्ये विभागणी करते ________.
अ) शतमक ब) दशमक क) चतुर्थक ड) मध्यगा
उत्तर : चतुर्थक
७)
दिलेल्या सामग्रीचे दहा समान भागांमध्ये विभागणी करते _____ .
अ) शतमक ब) दशमक क) चतुर्थक ड) मध्यगा
उत्तर : दशमक
८)
परकीय / विदेशी कंपन्यानी आपल्या देशात केलेली गुंतवणूक _______.
अ) विदेशी गुंतवणूक ब) विदेशी बचत
क) विदेशी रोजगार ड) नेटवर्क
उत्तर : विदेशी गुंतवणूक
९)
महाराष्ट्र राज्य लोकसंख्येच्या बाबतीत भारतात ______ क्रमांकाचे राज्य आहे.
अ) पहिल्या ब)
दुसऱ्या क) तिसऱ्या ड) चौथ्या
उत्तर : दुसऱ्या
१०) उत्पादक कर्ज आर्थिकदृष्ट्या न्याय असतात, कारण ______.
अ) ते
शेती उत्पादनाशी संबंधित आहे.
ब) त्याचा वापर वैयक्तिक उपभोगासाठी केला जातो.
क) ते दारिद्र्य निर्मुलनास मदत करतात.
ड) ते जीवनमान दर्जा उंचावण्यास मदत करतात.
उत्तर : ते शेती
उत्पादनाशी संबंधित आहे.
११)
तृतीय क्षेत्राचे पुढीलपैकी समाविष्ट होणारी बाब, म्हणजे ________.
अ) वनीकरण ब)
वाहतूक यंत्रणा क) दुग्धविकास ड) बागायती शेती
उत्तर : वाहतूक
यंत्रणा
१२)
स्वयंसाहाय्यतेचे मूल्य प्रोत्साहित करणे, लोकशाही, समता, आणि
एकता जपणे______.
अ) शिक्षण ब)
सहकार चळवळ क) आतिथ्य सेवा ड) पर्यटन
उत्तर : सहकार चळवळ
प्रश्न १. ब) विसंगत
शब्द ओळखा .
१)
प्राथमिक शिक्षण, आतिथ्य सेवा, उच्च शिक्षण, सर्वसमावेशक शिक्षण
२)
पुणे, हैद्राबाद, नाशिक, सातारा
३)
रसायने निर्मिती उद्योग, कापड निर्मिती उद्योग, मनोरंजन उद्योग, साखर निर्मिती उद्योग
४)
संदेशवहन, शिक्षण, वाहतूक, उर्जा
५)
शतमक, दशमक, चतुर्थक, अर्थशास्त्र
६)
कृषी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, सेवा क्षेत्र, सामाजिक क्षेत्र
७)
कागदी पैसा, धातू पैसा, प्लास्टिक पैसा, वस्तू
८)
भूमी,
श्रम, भांडवल, रोजगार
९)
उपयोगिता, दुर्मिळता, विनिमयता, गरजा
उत्तरे : १) आतिथ्य सेवा २) हैद्राबाद ३) मनोरंजन उद्योग ४)
शिक्षण ५) अर्थशास्त्र ६) सामाजिक शास्त्र ७) वस्तू ८) रोजगार ९) गरजा
प्रश्न २. अ) खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना
ओळखून ती स्पष्ट करा.
१) गौरवने त्याच्या बहिणीसाठी डेबिट कार्ड वापरून ड्रेस खरेदी
केला.
२) गणेशच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा अभ्यास.
३) मनिषाची आई तिच्या पगारातून दरमहा रुपये १००० वाचवते.
४) भारतात नाणी व चलनी नोटा व्यवहारात नाकारता येत नाहीत.
५) संतोषच्या वडिलांनी त्यांना मिळालेला प्रॉव्हिडंट फंड
किराणामालाचे दुकान थाटण्यासाठी वापरला.
६) पार्थ व त्याचे मित्र उन्हाळी सुट्टीत महाबळेश्वर येथे
फिरण्यासाठी गेले.
७) सुभाषने कर्ज
घेवून ठिबक संच खरेदी केला.
प्रश्न २. ब) फरक
स्पष्ट करा.
१)
सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र
२)
भूमी आणि भांडवल
३)
कागदी पैसा आणि धातू पैसा
४)
प्रमाणित नाणी आणि गौण / लाक्षणिक नाणी
४)
चतुर्थक आणि शतमक
५)
दशमक आणि शतमक
६) बिगर संस्थात्मक मार्ग आणि संस्थात्मक मार्ग
प्रश्न ३ खालील
प्रश्नांची उत्तरे लिहा.
१)
संपत्तीची वैशिष्टे स्पष्ट करा.
२)
गरजांची वैशिष्टे स्पष्ट करा.
३)
वस्तूविनिमयातील चार अडचणी स्पष्ट करा.
४)
खालील सामग्रीवरून तिसरे चतुर्थक (Q3) काढा
गुण |
१० |
२० |
३० |
४० |
५० |
६० |
विद्यार्थी
संख्या |
६ |
११ |
१९ |
१६ |
८ |
४ |
५) खालील सामग्रीवरून आठवे दशमक (D८) काढा
वेतन
|
१००
|
२००
|
३००
|
४०० |
५०० |
६००
|
मजुरांची
संख्या |
५
|
१२
|
२०
|
१५
|
७
|
५
|
६) महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रातील
समस्या स्पष्ट करा.
प्रश्न ४ खालील
विधानांशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा.
१)
उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य हे दोन्ही एकच आहेत.
२)
मानवी गरजा ह्या हवामान व पसंतीक्रमानुसार बदलत असतात..
३) वस्तू
विनिमयात कोणत्याही अडचणी नाहीत.
४) कोणतीही
वस्तू पैसा म्हणून कार्य करू शकते.
५) महाराष्ट्रातील
उद्योग क्षेत्रात समस्या आहेत.
६)
मध्यगेला दुसरे चतुर्थक असेही म्हणतात.
७)
लग्नाच्या खर्चासाठी घेतलेले कर्ज आर्थिकदृष्ट्या न्याय्य असते.
प्रश्न ५ सविस्तर उत्तरे लिहा.
१) सूक्ष्म
अर्थशास्त्राच्या मुलभूत संकल्पना स्पष्ट करा.
२) स्थूल अर्थशास्त्राच्या
मुलभूत संकल्पना स्पष्ट करा.
३)
महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रातील समस्या स्पष्ट करा.
४) पैशाची
कार्य स्पष्ट करा.
५) भारतातील
ग्रामीण विकासाचे महत्त्व स्पष्ट करा.
*****
Comments
Post a Comment