इयत्ता ११ वी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा – २०२४


इयत्ता ११ वी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा – २०२४ 

प्रश्न १ योग्य पर्याय निवडा. (४) 

१) लिओनेल रॉबिन्स यांच्या व्याख्येत पुढील मुद्द्यांचा विचार केला आहे. 

अ) अमर्यादित गरजा                ब) मर्यादित साधने 
क) गरजांना अग्रक्रम नसतो   ड) साधनांचे पर्यायी उपयोग 

पर्याय : १) अ,ब,ड    २) ब,क,ड    ३) अ,क,ड      ४) वरील सर्व 
उत्तर :  १) अ,ब,ड 

२) पैशाच्या उत्क्रांतीनुसार क्रम लावा. 

अ) प्लास्टिक पैसा       ब) कागदी पैसा 
क) इलेक्ट्रॉनिक पैसा   ड) पतपैसा 

पर्याय : १) ब, ड, अ आणि क         २) अ, ब, क आणि ड 
             ३) ड, क, ब आणि अ         ४) क, ब, अ आणि ड 
उत्तर : १) ब, ड, अ आणि क 

३) खालीलपैकी भारतातील लोकसंख्या विस्फोटाचे कारण नाही. 

अ) निरक्षरता                 ब) विवाहाची सार्वत्रिकता
क) एकत्र कुटुंबपद्धती   ड) राहणीमानातील सुधारणा 

पर्याय-  १) अ आणि ब     २) अ,ब आणि क   
            ३) ड                  ४) अ, ब, क आणि ड 
उत्तर : ३) ड

४) देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडणे म्हणजे 

अ) खाजगीकरण           ब) उदारीकरण 
क) जागतिकीकरण      ड) विमुद्रीकरण 

पर्याय - १) अ      २) ब      ३) क      ४) ड 
उत्तर : ३) क

प्रश्न २ विसंगत शब्द ओळखा. (४) 

१) महाराष्ट्र महसूल विभाग : नागपूर, पुणे, नांदेड, अमरावती 
 उत्तर : नांदेड

२) विभाजन मूल्य : चतुर्थक, दशमक, सामग्री, शतमक 
 उत्तर : सामग्री

३) उष्मांक : २४००, १८००, २१००, २२५०. 
उत्तर : १८०० 

४) शहरी भागातील बेकारी : सुशिक्षित बेकारी, छुपी बेकारी, 
                                           तांत्रिक बेकारी, औद्योगिक बेकारी 
 उत्तर : छुपी बेकारी

प्रश्न ३ सहसंबंध पूर्ण करा. (४)

१) वस्तुविनिमय : वस्तू : : आधुनिक अर्थव्यवस्था : पैसा 

२) ट्रॅक्टरसाठी कर्ज : उत्पादक कर्ज : : लग्न समारंभासाठी कर्ज : अनुत्पादक कर्ज 

३) व्यापारी बँक :  संस्थात्मक मार्ग : : सावकार : बिगर संस्थात्मक मार्ग 

४) ग्रामीण बेरोजगारी   : प्रच्छन्न बेरोजगारी : : नागरी बेरोजगारी : औद्योगिक बेरोजगारी 

प्रश्न ४ योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. (४) 

१) वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागविण्याची क्षमता 
 उत्तर : उपयोगिता 

२) ज्या पैशाला कायद्याचे पाठबळ असते व त्यामुळे जो पैसा नाकारता येत नाही तो पैसा म्हणजे 
उत्तर : विधीग्राह्य पैसा 

३) परकीय / विदेशी कंपन्यांनी आपल्या देशात केलेली गुंतवणूक. 
उत्तर : प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक 

४) सार्वजनिक सत्तेने आर्थिक प्राधान्य क्रमाची जाणीवपूर्वक आणि सहेतुक केलेली निवड. 
उत्तर : आर्थिक नियोजन 

प्रश्न ५ खाली दिलेल्या घटनांवरून तुमचे मत स्पष्ट करा : (४)

     ग्रामीण विकास हा प्रशासनाचा एक वंचित भाग आहे . महात्मा गांधी यांच्या मते , भारत हा खेड्यांचा देश आहे . खेड्यांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास साध्य करणे अशक्य आहे . विकासाच्या धोरणांचे एकत्रीकरण करण्यासाठी सर्व गरजांचे नियोजन करणे आवश्यक आहे . तळागाळातील लोकांच्या विकासासाठी प्रभावी प्रशासनाद्वारे ग्राम पातळीवर हे शक्य आहे. पंचायती राज्यव्यवस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीय व राज्य सरकारांच्या विकेंद्रीकरणाच्या दिशेने पाउल टाकण्यासाठी ‘ आदर्श गाव ’ या संकल्पनेचा संपूर्ण भारतातील यशस्वी यशोगाथांच्या माध्यमातून अभ्यास करणे गरजेचे आहे . शिक्षणातील विषमता कमी करण्यासाठी आणि साक्षरतेच्या प्रमाणात वाढ करण्यासाठी भारताची वाटचाल योग्य दिशेत सुरु असली तरी अजून बरेच काही करणे आवश्यक आहे. पूर्वीपासून वंचित असलेल्या भारतीय नागरिकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची स्वयंशासन हमी घेते. 

अ. महात्मा गांधींचे विचार थोडक्यात सांगा .

उत्तर : महात्मा गांधी यांच्या मते , भारत हा खेड्यांचा देश आहे . खेड्यांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास साध्य करणे अशक्य आहे . विकासाच्या धोरणांचे एकत्रीकरण करण्यासाठी सर्व गरजांचे नियोजन करणे आवश्यक आहे .

ब. गावाचा उत्कृष्ट नमुना तुमच्या शब्दांत मांडा .
उत्तर : 

Comments

Popular posts from this blog

स्वाध्याय प्रकरण १ अर्थशास्त्रातील मुलभूत संकल्पना

प्रकरण २ पैसा स्वाध्याय

11 th Economics Objective Type Question Bank